Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात शुक्रवारी ३,१४५ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात शुक्रवारी ३,१४५ नवीन रुग्णांची नोंद
, शनिवार, 16 जानेवारी 2021 (07:50 IST)
राज्यात शुक्रवारी ३,१४५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,८४,७६८ झाली आहे. राज्यात ५२,१५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ४५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,३३६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ४५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ८, ठाणे ४, नाशिक ६, पुणे ३, सोलापूर ३, नागपूर ४ व अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ४५ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू नाशिक ६, ठाणे ४, कोल्हापूर २,नागपूर १, सिंधुदुर्ग १ आणि मध्य प्रदेश १ असे आहेत.
 
तर ३,५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १८,८१,०८८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,८४,५८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८४,७६८ (१४.५० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,८५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनंजय मुंडेंनी २००६ सालापासून माझा फक्त वापर केला : रेणु शर्मा