Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात कोरोनाचे 3,898 नवीन रुग्ण, जाणून घ्या आकडेवारी

राज्यात कोरोनाचे 3,898 नवीन रुग्ण, जाणून घ्या आकडेवारी
, बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (08:05 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून 4 हजारांच्या खाली आला आहे.मंगळवारी 3,898 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3,581 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यामुळे बरे होणाऱ्यांची (Recover patient) संख्या आता 63 लाख 04 हजार 336 इतकी झाली आहे. 86 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
 
राज्यात सध्या 47 हजार 926 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रामाण (Recovery Rate) 97.08 टक्के एवढा झाला आहे.राज्यात  86 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 51 लाख 59 हजार 364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ) 64 लाख 93 हजार 698 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 3 लाख 06 हजार 524 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.तर 2 हजार 021 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
पुण्यातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 218 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 239 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04.
– 211 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 497155.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2141.
– एकूण मृत्यू – 8958.
- एकूण डिस्चार्ज – 486056.
– केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 6425.
 
पिंपरी चिंचवडमधील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 176 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 273 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात कोरोनाबाधित 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या 24 तासात एकही मृत्यू नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 270786.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1338.
– एकूण मृत्यू – 4405.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 265453.
– केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4159.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परळी सुन्न आहे… असं म्हणत पंकजा यांचा धनंजय मुंडेवर निशाणा