Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परळी सुन्न आहे… असं म्हणत पंकजा यांचा धनंजय मुंडेवर निशाणा

परळी सुन्न आहे… असं म्हणत पंकजा यांचा धनंजय मुंडेवर निशाणा
, बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (08:00 IST)
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बंड पुकारलेल्या करुणा शर्मा यांना जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भाजप करुणा शर्मा यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. दरम्यान, माजी मंत्री भाजप नेत्या पंकडा मुंडे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये त्यांनी ‘परळी सुन्न आहे. राज्याची मान खाली गेली आहे,’ असं म्हटलं आहे. 
 
“अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, ही काळाची गरज आहे, परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची,” असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' दिवशी दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजन