Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाचा, महाविद्यालयं उघडण्यासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत काय म्हणाले

webdunia
, मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (21:41 IST)
करोना प्रादुर्भावामुळे राज्यातली सर्व शाळा महाविद्यालयं सध्या बंद ठेवण्यात आली आहेत.  आता महाविद्यालयं उघडण्यासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.
 
उदय सामंत आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सीईटी परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. सीईटी परीक्षेच्या तारखाही सामंत यांनी यावेळी जाहीर केल्या. ते म्हणाले, यावर्षी सीईटीला एकूण आठ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थी बसणार आहेत. मागच्या वर्षी सीईटीची १९७ केंद्रे होती. यावर्षी त्यात वाढ झाली असून २२६ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने यंदा ही परीक्षा घेतली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दाभोलकर हत्या प्रकरण, सर्व पाच आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करा