Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात बुधवारी ३,९१३ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात बुधवारी ३,९१३ नवीन रुग्णांची नोंद
, गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (10:00 IST)
राज्यात बुधवारी ३,९१३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,०६,३७१ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ५४,५७३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४८,९६९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.
 
राज्यात बुधवारी ९३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १४, ठाणे ४, रायगड ६, नाशिक ९, अहमदनगर ५, पुणे ९, सोलापूर ८, औरंगाबाद १३, चंद्रपूर ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ९३ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू औरंगाबाद ११, नाशिक ७, रायगड ४, पुणे २, सोलापूर १, ठाणे १, पालघर १, यवतमाळ १, नागपूर १, जालना १, जळगाव १ आणि अमरावती १ असे आहेत.
 
बुधवारी ७,६२० रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,०१,७०० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५१ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,२२,७८,४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,०६,३७१ (१५.५३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,८८,७२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एल्गार परिषदेला स्वारगेट पोलिसांकडून परवानगी नाकारली