Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत ३ विमानांतून एकूण ५९० प्रवासी आले, अद्याप काेणालाही कोरोना लक्षणे नाहीत

मुंबईत ३ विमानांतून एकूण ५९० प्रवासी आले, अद्याप काेणालाही कोरोना लक्षणे नाहीत
, बुधवार, 23 डिसेंबर 2020 (09:01 IST)
मुंबईत येणाऱ्या परदेशी प्रवाशांना सोमवारी मध्यरात्रीपासून क्वारंटाइन करण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने घेतला. त्यानंतर आतापर्यंत प्रवासात असलेली पाचपैकी तीन विमाने ब्रिटन येथून मुंबईत दाखल झाली आहेत. या तीन विमानांतून एकूण ५९० प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले. यापैकी अद्याप काेणाला लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र खबरदारी म्हणून प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. पाच दिवसांनंतर त्यांची चाचणी करण्यात येईल.
 
परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी महापालिकेने पंचतारांकित व फोर स्टार हॉटेलमध्ये दोन हजार खोल्या राखीव ठेवल्या आहेत. 
 
ब्रिटनमधून येणारे २३६ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील असल्याने त्यांनी आपल्या राज्यात पाठविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले असून, अन्य राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येईल. याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना कळविण्यात आले आहे, असे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
 
अशी आहे माहिती 
 
AI - १३० या विमानाने २५० प्रवासी मुंबईत आले. ६३ मुंबई, ७५ महाराष्ट्र, ११२ राज्याबाहेरील आहेत.
VS - ३५४ या विमानाने ११५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ५२ मुंबई, ३० महाराष्ट्र, ३३ महाराष्ट्राबाहेरील आहेत.
BA - १३९ या विमानाने २२५ प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी ७२ मुंबईमधील, ६२ महाराष्ट्रातील तर ९१ प्रवासी महाराष्ट्राबाहेरील आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय यंत्रणांना काही महत्त्वाचे निर्देश 'असे'