Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात 4.19 लाख सक्रिय रुग्ण, पुणे, मुंबईसह 5 जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण

राज्यात 4.19 लाख सक्रिय रुग्ण, पुणे, मुंबईसह 5 जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण
, बुधवार, 19 मे 2021 (07:56 IST)
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना  संसर्गाचा वेग मंदावत आहे. नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या कमी झाली असून, बरे होणा-या रुग्णांची संख्या  वाढली आहे. राज्यात सध्या 4.19 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.
 
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात मंगळवारी 28 हजार 438 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 54 लाख 33 हजार 506 एवढी झाली आहे. त्यापैकी 49 लाख 27 हजार 480 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 52 हजार 898 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
सध्या राज्यात 4 लाख 19 हजार 727 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात सर्वाधिक 72 हजार 79, मुंबईत 31 हजार 790, ठाण्यात 28 हजार 257, नागपूर मध्ये 26 हजार 794 तर, सोलापूर जिल्ह्यात 20 हजार 54 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, नाशिक, सातारा व अहमदनगर जिल्ह्यात जवळपास वीस हजार सक्रिय रुग्ण आहेत.
 
राज्यात 679 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 83 हजार 777 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.54 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 90.69 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 15 लाख 88 हजार 717 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 17.25 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 30 लाख 97 हजार 161 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 25 हजार 4 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाचा, पुणे महानगर पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय