Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात ८ हजार ४७० नवीन करोनाबाधित

राज्यात ८ हजार ४७० नवीन करोनाबाधित
, बुधवार, 23 जून 2021 (08:06 IST)
राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. शिवाय दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत मागील बऱ्याच दिवसांपासून करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. मंगळवारी राज्यात ९ हजार ४३ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८ हजार ४७० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, राज्यात १८८ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
 
राज्यात मंगळवारी एकूण ५७,४२,२५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९ टक्के एवढे झाले आहे.
 
सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९८,८६,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,८७,५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५८,८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण १,२३,३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
दरम्यान, दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत मागील बऱ्याच दिवसांपासून करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दिवसभरात राज्यात ९ हजार ४३ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८ हजार ४७० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, आज राज्यात १८८ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ५७,४२,२५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९ टक्के एवढे झाले आहे.
 
सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९८,८६,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,८७,५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५८,८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण १,२३,३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाविकास आघाडीमध्ये कोणताही विसंवाद नाही : एकनाथ शिंदे