Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोनाबाधित रुग्ण
, शुक्रवार, 21 मे 2021 (08:43 IST)
राज्यात गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसत आहे. पण कोरोना मृत्यूचा आकडा हा बुधवारच्या तुलनेत वाढला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ९७ हजार ४४८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८५ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ८३ हजार २५३ जणांवर उपचार सुरू आहेत.
 
राज्यात ४७ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५० लाख २६ हजार ३०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.४३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ७३८ मृत्यूंपैकी ४२९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २१ लाख ५४ हजार २७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ९७ हजार ४४८ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २९ लाख ३५ हजार ४०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान कोविड-१९ टँकरच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ५९ लाख ५६ हजार ४०६वर पोहोचली आहे. यापैकी २ लाख ८९ हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी २५ लाख ८० हजार २०३ रुग्ण कोरोनामुक्त आहेत. देशात सध्या ३० लाख ७५ हजार ९७८ सक्रिय रुग्ण आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सराईत गुन्हेगाराला फेसबुक पोस्ट पडली महागात; ‘भाई का बड्डे’ थेट पोलीस कोठडीत