Publish Date: Mon, 05 Jul 2021 (09:00 IST)
Updated Date: Mon, 05 Jul 2021 (09:17 IST)
महाराष्ट्रात रविवारी 9 हजार 336 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 3 हजार 378 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 58 लाख 48 हजार 693 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने एएनआयने याबाबत आकडेवारी, महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 लाख 98 हजार 177 एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 23 हजार 225 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात 123 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 23 हजार 030 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.01 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 95.91 एवढा झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 42 हजार 943 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 38 हजार 004 लोक होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 198 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.