सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं ३० एप्रिल पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली. सध्या देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील काय निर्णय होईल याकडे आमचं लक्ष आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.
यापूर्वी सिव्हिल एव्हिएशनकडूनही यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. विमान कंपन्या १४ एप्रिल नंतर कोणत्याही तारखेची तिकिट विक्री सुरू करू शकतात. २५ मार्च रोजी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. तो १४ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे, असं सिव्हिल एव्हिएशनचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी सांगितलं होतं.