लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसत आहे. त्यातही डबघाईला आलेल्या एअर इंडियाला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. यासाठी कंपनीने २०० वैमानिकांना कामावरून कमी केलं आहे. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट देखील रद्द केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त समोर आलं आहे.
केंद्र सरकरने यापूर्वीच खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द केली आहेत. त्या पाठोपाठच राज्य सरकारने देखील देशांतर्गत विमान सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक हवाई कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. तसंच उड्डाणे रद्द असल्याने एअर इंडियाच्या महसूलात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कंपनीने २०० वैमानिकांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निवृत्तीनंतर पुन्हा एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या वैमानिकांचा देखील समावेश आहे.