Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विप्रो समुहाकडून मोठी मदत जाहीर

विप्रो समुहाकडून मोठी मदत जाहीर
, बुधवार, 1 एप्रिल 2020 (21:41 IST)
कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत  विप्रो लिमिटेड, विप्रो एन्टरप्राईज आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी  ११२५ कोटीची मदत करण्याचे ठरवले आहे. यापैकी विप्रो लिमिटेड १०० कोटी, विप्रो एन्टरप्रायजेस २५ कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन १००० कोटी रुपये देऊ करणार आहे. या पैशांमुळे मानवजातीला कोरोनापासून वाचवण्यासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला मदत होईल, असे अझीम प्रेमजी फाऊंडेशनने म्हटले आहे.
 
यापूर्वी देशातील अनेक उद्योग समूहांनी मदतीचा हात पुढे केला होता. यामध्ये टाटा ट्रस्ट आणि टाटा ग्रूप यांनी एकत्रितपणे १५०० कोटी रुपये देऊ केले होते. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी ५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तर इन्फोसिस या उद्योग समूहाने तब्बल १०० कोटीची मदत सरकारला देऊ केली आहे. तसेच महिंद्रा समूहाने कोरोनाच्या रुग्णांना लागणाऱ्या  व्हेंटिलेटर्सची निर्मिती करायला सुरुवात केली होती. महिंद्राकडून महिन्याला ३००० व्हेंटिलेटर्स तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठी मदत होईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध : रिझवी