कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय घेतला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वैर असलेलेच काही कट्टरपंथी मुस्लीम त्या निर्णयाला विरोध करत आहेत, असे वक्तव्य शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केले आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्याद्वारे संदेश दिला आहे.
पंतप्रधानांशी वैर असलेलेच काही मुस्लीम लोक लॉकडाउनसारख्या निर्णयाला विरोध करत आहेत. लॉकडाउनमध्ये नियमांचे पालन देखील करत नाही. देव न करो की हा आजार मुस्लीम भागांमध्ये पसरुन त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी या लोकांनाच जबाबदार धरण्यात यावे. त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सरकारने खटले दाखल केले पाहिजेत, अशी मागणी रिझवी यांनी केली आहे.