Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा

shiv bhojan
, बुधवार, 1 एप्रिल 2020 (17:40 IST)
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता तसेच कामगारवर्ग यांना अल्पदरात भोजन मिळावे यासाठी जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा विस्तार करून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी 
संबंधितांना दिले आहेत लातूरचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेशी संपर्क करून पालक मंत्री देशमुख यांनी लवकरात लवकर म्हणजे येत्या एक-दोन दिवसात लातूर जिल्ह्यातील सर्व म्हणजे १० तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन योजना सुरू होईल या पद्धतीने तातडीने कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत.
 
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सध्या लॉकडाउन ची स्थिती आहे. या परिस्थितीत गरीब जनता तसेच कामगारवर्ग भोजनावाचून वंचित राहूनये यासाठी शासनाच्या वतीने या शिवभोजन योजनेचा विस्तार केला जात आहे, सर्व तालुक्याच्या ठिकाणी योजना सुरु होत असताना लातूर ग्रामीण साठी मुरुड याठिकाणी ही सोय 
केली जाणार आहे. गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करून याठिकाणी सामाजिक आंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळले जावेत असेही देशमुख यांनी म्हटले आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास महाराष्ट्रातीलपुणे येथे 136 जणांची ‘हजेरी’