राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले असून ठणठणीत बरे झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. सुप्रिया यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.
कोरोनाच्या काळात सतत दौऱ्यांवर होते. विविध ठिकाणी भेटी, मंत्रालयातील बैठका तसेच अतिवृष्टीच्या काळात फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते दौरे करत होते. याच दरम्यान त्यांना काहीसा थकवा जाणवत होता. त्यामुळे ते चार-पाच दिवस होम क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर खबरादारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, घरी परतल्यानंतर ते आठ दिवस घरीच विश्रांती घेणार आहेत, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे दिली आहे.