Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
, गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (11:29 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र, त्यांची तब्येत ठिक नाही, ते आज घरीच होते. दिवसभर त्यांना अशक्त वाटत आहे. त्यांना अशक्त वाटत असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली. दरम्यान, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
 
दरम्यान, ते उद्या काही अपरिहार्य कारणास्तव २२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी, असे त्यांनी कळविण्यात आले आहे.
 
अजित पवारांना कणकण आणि थोडासा ताप असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. सुदैवाने त्यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.  अजित पवार यांना थकवा जाणवत असल्याने ते घरीच आराम करत आहेत. परतीच्या पावसाने राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. याची पाहणी करण्यासाठी अजित पवार पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. अजित पवारांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Happy Birthday Amit Shah: गृहमंत्री अमित शहा यांचा आज birthday 56 वा वाढदिवस, पंतप्रधान मोदी म्हणाले- देश त्यांचे योगदान पाहत आहे