कोरोना व्हायरसच्या या युद्धात सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आले आहेत. काही कलाकारांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी आर्थिक मदत केली आहे तर अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत देऊ केली आहे. अभिनेता अक्षय कुमार याने पंतप्रधान सहायता निधीसाठी 25 कोटींची मदत केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेला तीन कोटींची मदत देऊ केली आहे.
जगातील अनेक देश कोरोनाव्हायरसशी दोन हात करत आहेत. कोरोनाला थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईची लोकसंख्या पाहता मोठ्या प्रमाणावर लोकांची चाचणी करणे हे आव्हान आहे. यासाठी टेस्टींग किट्स आणि मास्क कमी पडू नयेत यासाठी अक्षयने पालिकेला ही तीन कोटींची मदत केली आहे.