Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमिताभ बच्चनही कोरोना बचावासाठी आयसोलेशन व क्वारंटाईनमध्ये गेले

अमिताभ बच्चनही कोरोना बचावासाठी आयसोलेशन व क्वारंटाईनमध्ये गेले
, बुधवार, 18 मार्च 2020 (16:45 IST)
कोरोना व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी अनेकांनी विलीगीकरणाचा मार्ग पत्करल्याचे चित्र आहे.  97 वर्षांचे दिलीप कुमार कोरोनापासून बचावासाठी आयसोलेशन व क्वारंटाईनमध्ये गेलेत. यानंतर भजनसम्राट अनुप जलोटा हेही आयसोलेशनमध्ये आहेत. आता महानायक अमिताभ बच्चन यांनीही स्वत:ला आयसोलेशनचा मार्ग पत्करला आहे.
 
खुद्द अमिताभ यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. अमिताभ यांनी ट्विटरवर आपल्या हाताचा एक फोटो शेअर केला. यात एक स्टॅम्प (निळ्या शाईचा शिक्का)लागलेला आहे. या स्टॅम्पमध्ये आयसोलेशन अर्थात क्वारंटाईनबद्दल लिहिले आहे. जे लोक क्वारंटाईनमध्ये आहेत, त्यांच्या हातावर बीएमसीकडून असा स्टॅम्प लावण्यात येत आहेत. आता अमिताभ काही दिवस घरात बंद असतील. 31 मार्चपर्यंत कोरानापासून बचावासाठी ते घरात राहतील. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये अन्य लोकांनाही काळजी घेण्याचे व सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात आणखी चार ते पाच प्रयोगशाळा उभारण्यात येणार