भारत बायोटेक कंपनी Covaxin ची माकडांवर कोरोना लशीची चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा कंपनीने केली आहे. कंपनीची पहिल्या टप्प्यातील कोरोना चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे.
लाइव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये माकडांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार माकडांवर केलेल्या लशीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली आहे.
कंपनीने मकाका मुलाटा जातीच्या विशिष्ट प्रकारच्या माकडांवर ही चाचणी केली. पहिल्या टप्प्यातील कोरोनाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता काही दिवसांत चाचणीचा दुसरा टप्पा सुरू होईल अशी माहिती देण्यात आली आहे.