Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनावर स्वस्त आणि प्रभावी औषध फक्त ५९ रुपये

कोरोनावर स्वस्त आणि प्रभावी औषध फक्त ५९ रुपये
, शनिवार, 25 जुलै 2020 (08:59 IST)
देशात कोरोना व्हायरसचे स्वस्त आणि प्रभावी औषध डीजीसीआयने (ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) बाजारात आणण्यास मान्यता दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या औषधाची किंमत फक्त ५९ रुपये असणार आहे. ब्रिंटन फार्मास्युटिकल्सने (Brinton Pharma) हे औषध तयार केले आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, डीजीसीआयने कडून त्याला अँटीवायरल ड्रग फॅव्हीपिरावीरच्या फॅव्हीटन या ब्रँड नावावर मार्केटिंग करण्याची परवानगी मिळाली आहे.
 
कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, हे औषध २०० मिलीग्रामच्या टॅब्लेटच्या रूपात असणार आहे. त्याची जास्तीत जास्त विक्री किंमत ५९ रुपये असेल म्हणजे बाजारात कोणत्याही परिस्थितीत ती ५९ रुपयांपेक्षा जास्त विकली जाणार नाही. तसेच जागतिक क्लिनिकल पुराव्यांवरून असे सांगितले जाते की कोरोना विषाणूच्या सौम्य ते मध्यम कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी फॅव्हीपिरावीर एक प्रभावी उपचार पर्याय आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राममंदिर भूमिपूजनासाठी ही अशुभ वेळ : शंकराचार्य