Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिलासादायक: मेक इन इंडिया टेस्ट कोरोना किट तयार झाले

webdunia
गुरूवार, 26 मार्च 2020 (08:53 IST)

भारताने पहिल्यांदाच मेक इन इंडिया टेस्ट किट तयार केलं.  याच किटच्या मदतीने काही तासांमध्ये संशयित व्यक्तीला कोरोनाची लागण झाली की नाही हे स्पष्ट होणार आहे. पुण्याच्या मायलॅब्सकंपनीने या उपयुक्त किटचा शोध लावला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या किटला मंजूरी दिली आहे. 

लवकरच हा किट रुग्णांच्या तपासणीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हा किट अत्यंत उपयुक्त ठरेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढचा धोका ओळखून या लॅबनं आधीच संशोधन सुरू केलं आणि अवघ्या सहा आठवड्यांत हे मेड इन इंडिया किट तयार केलं. 

मायलॅब्सचे प्रमुख डॉ. वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार,  कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी साकारण्यात आलेला हा किट अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या किटची किंमत फक्त १ हजार २०० रूपये आहे.  या किटचं वैशिष्ट्य म्हणजे किटद्वारे फक्त दोन तासांच्या आत रिपोर्ट मिळतील. या किटच्या मदतीने एका वेळी जवळपास १ हजार रक्तांचे नमुने तपासू शकतो.


Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

अमिताभ यांचा नवा विडीओ, पाहा कोरोनाबद्दल काय सांगतात ते