Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

StrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत

StrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत
, गुरूवार, 26 मार्च 2020 (08:31 IST)
‘द इंडियन स्ट्रोक असोसिएशन’ने StrokeSOS हे अ‍ॅप लॉंच केले असून पक्षाघाताच्या रुग्णांना आकस्मिक संकटकालीन स्थितीत मदत करणे हा या App चा उद्देश आहे. पक्षाघातामुळे अचानक आणीबाणीची स्थिती उद्भवल्यास काय करावे, कुठे जावे याबाबत रुग्णांना माहिती आणि मदत एकाच अ‍ॅपवर मिळणार आहे. 
 
हे अ‍ॅप पक्षाघाताच्या रुग्णांना आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करते. रुग्ण नेमका कुठे आहे जाणून घेते, पक्षाघाताची सर्वसामान्य लक्षणे काय असतात त्याची माहिती पुरवते आणि पक्षाघातावरील उपचार पुरवले जाऊ शकतील अशी रुग्णाला सर्वात जवळची हॉस्पिटल्स (सरकारी आणि खाजगी) कोणती आहेत याची माहिती पुरवते. अ‍ॅपमध्ये हॉस्पिटलचे फोन नंबर, तसेच हॉस्पिटलचे नेमके ठिकाण आणि गूगल मॅपच्या मदतीने तिथे कसे पोचता येईल, त्यासाठी किती वेळ लागेल ही सर्व माहिती पुरवली जाते.
 
या अ‍ॅपमुळे पक्षाघाताचे रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक, त्यांची काळजी घेत असलेल्या व्यक्तींना पक्षाघातावरील उपचारांसाठी सर्वात जवळची लिस्टेड हॉस्पिटल्स कोणती आहेत ते शोधून काढून त्यांना मदतीसाठी विनंती करता येईल. यात पक्षाघातातून बरे होण्याच्या दृष्टीने उपाययोजना, डॉक्टरांसाठी माहिती, पक्षाघातामध्ये असलेले धोके, रुग्णांची काळजी घेत असलेल्या व्यक्तींसाठी माहिती, रुग्णांच्या स्थिती आणि गरजेनुसार व्यक्तिगत पुनर्वसन प्रक्रिया इत्यादींचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CoronaVirus: Big Bazaar देणार होम डिलिव्हरी