Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थंडपेय, आइस्क्रीमला कोट्यवधींचा फटका

थंडपेय, आइस्क्रीमला कोट्यवधींचा फटका
, शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (15:24 IST)
जगभर थरकाप उडवून दिलेल्या कोरोना विषाणूने अनेक व्यवसायाची वाट लावली असून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मागणी असणार्‍या थंडपेय व आइस्क्रीम विक्रेत्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात थंडपेय, रसपानगृहे, मठ्ठा, ताक तसेच आइस्क्रीमचा व्यवसाय तेजीत चालतो. जानेवारीच्या पंधरवड्यापासून जून अखेरपर्यंत  या व्यवसायात मोठी उलाढाल होते. परंतु यंदा कोरोना विषाणूच्या महामारीने थंडपेयांची विक्री थंडावली आहे. आइस्क्रीमलाही म्हणावी तशी मागणी नाही. थंडपेयामुळे सर्दी येण्याची शक्यता असते. सध्या सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दिसली की प्रत्येकांच्या काळजाचा थरकाप उडत आहे. यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर सहजासहजी उपलब्ध होत नसल्यामुळे या थंडपेयांकडे बहुतांश नागरिकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे थंडपेय, आइस्क्रीम विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

उन्हाळ्यात चौका-चौकात उसाची रसपानगृहे दिसतात. थंडपेयांपेक्षा उसाचा रस आरोग्दायी असतो त्यामुळे रस प्राशन करून काही लोक घरी पार्सल घेऊन जात होते. लॉकडाउन व संचारबंदीमुळे या व्यवसायालाही फटका बसला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जनधन खात्यातील रक्कम परत जाणार नाही : सोनवणे