Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिलासादायक ! राज्यात 24 तासात ‘कोरोना’च्या 751 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

दिलासादायक ! राज्यात 24 तासात ‘कोरोना’च्या 751 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
, मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (08:46 IST)
राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची  संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना  रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. आजही राज्यात 751 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1555 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत 64 लाख 60 लाख 663 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.62 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 15 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 403 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 13 हजार 649 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 33 लाख 02 हजार 489 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 18 हजार 347 (0.46%) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 38 हजार 179 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 865 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपनेच ST कर्मचाऱ्यांना भडकवले, अनिल परबांचा थेट आरोप; दिला ‘हा’ इशारा