Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना : चीनच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून धोका?

कोरोना : चीनच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून धोका?
नवी दिल्ली , गुरूवार, 5 मार्च 2020 (14:43 IST)
वस्तू आता 30 टक्क्यांनी महाग 
चीनमधील कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात भीती पसरली आहे. जगभरात चीनच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूला खूप मागणी आहे. परंतु, कोरोना व्हायरसुळे या वस्तू आता 30 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. चीनमधून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात बंद करण्यात आली आहे. परंतु, बाजारात आधीच असलेले इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री होत आहे. परंतु, हे पॅकिंग उघडताना काळजी घेतली जात आहे. हातात हातमोज्यांचा वापर कर्मचार्‍यांकडून केला जात आहे.
 
चीनमधून येत असलेल्या सामानांची तपासणी करताना किंवा इलेक्ट्रॉनिक उत्पादने उघडताना काळजी घेणे गरजेचे आहे.
 
आम्ही आमच्या कर्मचार्‍यांनी यासंबंधी काळजी घ्यायला सांगितली आहे. हातमोज्यांचा वापर करणे हे सर्वांसाठी चांगले आहे, असे ऑल दिल्ली कॉम्प्युटर ट्रेडर्स असोसिएशन, नेहरू, प्लेसचे अध्क्ष महेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. तसेच एम्सच डॉक्टरांनीही सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
 
इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दर आणखी वाढणार आहेत. भारतीय बाजारात आता चीनहूनेणार्‍या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात बंद होत आहे. फ्रेब्रुवारीत कोणत्याही प्रकारचा माल पोहोचला नाही. त्यामुळे या वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये सरकारी कार्यालयात क्लोजिक होत असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. चीनमधून दोनतीन महिन्यापूर्वी जे सामान आले आहे. ते सामान उघडताना हातमोज्यांचा वापर करावा. जर एखाद्या ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक सामान दाखवायचे असेल, तर अशावेळी काळजी घेणे गरजेचे आहे. चीनमध्ये सामानांची पॅकिंग कोरोना व्हायरस रुग्णांनी केल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनातून जगाला कायमस्वरूपी रिसेट बटण मिळेल : महिंद्रा