राज्यात सोमवारी 04 हजार 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 03 हजार 741 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 68 हजार 112 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 97.02 टक्के झाला आहे. आज 52 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
राज्यात सध्या 51 हजार 834 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 38 लाख 12 हजार 827 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 64 लाख 60 हजार 680 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 02 लाख 88 हजार 489 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 299 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.48 %
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 13 हजार 781 रुग्णांपैकी 10 लाख 85 हजार 708 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.ॲक्टिव्ह रुग्ण 9 हजार 516 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 557 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.48 टक्के आहे.