Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठवाड्यात कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो, विभागीय आयुक्त यांची ऑडियो क्लिप व्हायरल

Corona
, बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (16:30 IST)
औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीही एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी मराठवाड्यात कोरोनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकणार असल्याने सावध राहण्याच्या सूचना दिल्या असून, बीड, नांदेड आणि लातूरबाबत त्यांनी अधिक चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे सुनील केंद्रेकर यांनी मराठावाड्यातील पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना अ‍ॅलर्ट राहा, कोरोना रोखण्यासाठी कामाला लागा, असे आदेशच दिले आहेत.
 
सुनील केंद्रेकर यांच्या नावाने एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप 11 मिनिटं 19 सेकंदाची आहे. या क्लिपमधून ते अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. क्लिपमध्ये किर्रर्र असा रातकिड्यांचा आवाज येत असल्याने केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांशी रात्री संवाद साधल्याचं दिसत आहे. या संपूर्ण 11 मिनिटे 19 सेकंदाच्या क्लिपमध्ये त्यांचा एकतर्फी संवाद सुरू आहे. तेच एकटे बोलत असून संबंधितांना सूचना देत आहेत. त्यांचं बोलणं असताना एकाही अधिकाऱ्याने त्यांना प्रश्न विचारलेला नाही किंवा त्यांच्या बोलण्याला हुंकारही दिलेला नाही. या क्लिपमधून केंद्रेकर कोरोनाचा उद्रेक होण्याच्या भीतीने चिंतेत दिसत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना सूचना देतानाच मध्येमध्ये अधिकाऱ्यांवर भडकताना दिसत आहेत. ज्या जिल्हाधिकाऱ्यांची कामगिरी अत्यंत टुकार झाली आहे, त्यांनाही ते झापताना दिसत आहेत. एकूणच या संभाषणावरून मराठवाड्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ शकण्याची भीती व्यक्त होत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उदयनराजे भोसले यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट