Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 11 April 2025
webdunia

विदर्भात कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट

In Vidarbha
, मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (16:32 IST)
राज्यात विदर्भात कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसत आहे. नागपुरात सोमवारी 498 कोरोनाबाधित वाढलेत. शहरात तीन आणि ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. महत्वाचं म्हणजे 2 हजार सहाशे 35 चाचण्या झाल्या होत्या. यामध्ये 498 पॉझिटीव्ह आले असून त्याचे प्रमाण 18 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या दहा दिवसांपासून नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला असून त्यामुळे प्रशासनाच्याही चिंता वाढल्या आहेत. दरम्यान कोरोनाच्या नियमांचं अजून पालन होत नसल्याचं चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसून येत आहे. पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. 
 
नागपुरात कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने कारवाई अजून तीव्र केली आहे. निर्धारित संख्येपेक्षा अधिक व-हाडी आढळून आल्याने महापालिकेनं विवाह सोहळा असलेल्या परिवारासह मंगल कार्यालयालाही दंड ठोठावला आहे. नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने नरेंद्रनगर येथील तुकाराम सभागृहात झालेल्या लग्न समारंभात निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या लोक असल्याने दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला.
 
तर वर्धा जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद आहेत. वर्ध्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तसा आदेश जारी केला आहे. वर्धा जिल्ह्याची कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता महाविद्यालये बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व कृषक आणि महाविद्यालये राहणार बंद आहेत.28 फेब्रुवारीनंतर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय महाविद्यालयाबाबत घेण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील : वडेट्टीवार