पूजा चव्हाण प्रकरणावरून राठोड यांच्यावर भाजपाकडून केल्या जात असलेल्या टीकेला वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्याकडेही भाजपा नेत्यांची महिलांसोबतची प्रकरणं आहेत,” असा दावा त्यांनी केला आहे.
राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणावर भूमिका मांडली. “संजय राठोड यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती आहे. भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजपा नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन योग्य केले. लवकरच याप्रकरणातील सत्य बाहेर येईल,” असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे.