Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरावतीत लस घेतल्यानंतरही 19 जणांना कोरोना

अमरावतीत लस घेतल्यानंतरही 19 जणांना कोरोना
, बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (16:43 IST)
अमरावतीत लस घेतल्यानंतरही तब्बल 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या माहितीवर आरोग्य यंत्रणेकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
 
कोरोनाविरोधातील लढाईत अग्रभागी असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत अमरावतीतही 10 हजार 874 जणांना या लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
 
महिनाभरानंतर या सर्वांना कोरोना लशीचा दुसरा डोसही देण्यात येण्यार आहे. मात्र त्याआधीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लस घेतलेले 19 जण आता कोरोनाबाधित आढळले आहेत. 
 
कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात अ‍ॅण्टीबॉडी तयार होतात. मात्र ही लस घेतल्यानंतरही एक ते दीड महिना कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो. त्यामुळे तोपर्यंत कोरोनापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

House on Rent: भाड्यावर घर घेण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या, मकानमालकाशी होणार नाही झंजट