Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य सरकारकडून माघी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

राज्य सरकारकडून माघी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी
, बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (08:25 IST)
गेल्या कित्येक महिन्यांपासून किबहुना 2020 या संपूर्ण वर्षभरातच कोरोनाच्या संकटामुळे अनेक सणउत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले. आता अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच 15 फेब्रुवारी 2021 ला असणारी गणेश जयंती आणि तेव्हापासून सुरु होणाऱ्या माघ गणेशोत्सवासाठीही राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
 
-मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत, आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत.
-मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरता ४ फूट आणि घरगुती गणपती मूर्तीची २ फूटांच्या मर्यादेत असावी.
-या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू/ संगमरवर मूर्तींचं पूजन करावं.
-मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं.
-माघी सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्य्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरं आयोजित करावी. 
-श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क इत्यादीद्वारे उपलब्ध करावी.
-गणपती मंडपात निर्जंतुकीकरणाची आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी.
-मंडपात एकावेळी १० पेक्षा जाता कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. 
- एकावेळी फक्त १५ भाविकांना दर्शनासाठी प्रवेश द्यावा.मूर्ती विसर्जनाच्या वेळी जास्तीत जास्त ५ कार्यकर्ते असावेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणार्‍यांचे परवाने तत्काळ रद्द होणार