Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी
, सोमवार, 30 मार्च 2020 (16:48 IST)
पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त या रूग्णावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य अगदी ठणठणीत बरे होऊन घरी गेले. ही समाधानकारक बाब समोर आल्यानंतर आज कोरोनाचा पुण्यात पहिला बळी गेल्याची माहिती मिळत आहे. 
 
या व्यक्तीचा परदेश दौरा झाला होता का? याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पुण्यात दुबईहून फिरून आलेल्या दाम्पत्याला पहिली कोरोनाची लागण झाली होती. पिंपरी चिंचवड आणि पुणे असून मिळून आतापर्यंत ४२ कोरोनाबाधित रूग्ण सापडले होते. पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवातीला कोरोना बाधित झालेल्या तीन रुग्णांना काही दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

EPF मधील पैसे काढण्यासाठी काही अटींसह परवानगी