Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना अपडेट्स – नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आसपास

कोरोना अपडेट्स – नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आसपास
, सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (16:30 IST)
नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत सोमवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ९२५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. रविवारी ही संख्या १७३१ होती मात्र सोमवारपर्यंत ही संख्या १९४५ झाली असून त्यात २१४ ने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
 
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५९, चांदवड १७, सिन्नर ६७, दिंडोरी ४४, निफाड ९९, देवळा १९, नांदगांव ५५, येवला २७, त्र्यंबकेश्वर २९, सुरगाणा ०९, पेठ ०२, कळवण १९,  बागलाण ३१, इगतपुरी १८, मालेगांव ग्रामीण ३६ असे एकूण ५३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार १७६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २१४ तर जिल्ह्याबाहेरील २४ असे एकूण १ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख १९ हजार ९५८ रुग्ण आढळून आले आहेत.
 
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.१४ टक्के, नाशिक शहरात ९७.१९ टक्के, मालेगाव मध्ये ९२.०४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.५१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.६४ इतके आहे.
नाशिक ग्रामीण ८२३ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७६  व जिल्हा बाहेरील ५५ अशा एकूण २ हजार ८८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
– १ लाख १९ हजार ९५८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख १५ हजार ९२५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १ हजार ९४५ पॉझिटिव्ह रुग्ण.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट प्रवाशाजवळ नसल्यास कर्नाटक महाराष्ट्रातील प्रवाशांची नो एंट्री