Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना व्हायरस; उत्पत्ती, लक्षणे आणि उपाय

कोरोना व्हायरस; उत्पत्ती, लक्षणे आणि उपाय
, शुक्रवार, 6 मार्च 2020 (17:33 IST)
डॉ. ओम श्रीवास्तव, संचालक संसर्गजन्य रोग विभाग, जसलोक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र
नवीन वर्षाच्या सुरुवातीस एक नवीन आव्हान जगासमोर उभे ठाकले आहे, एक व्हायरल इन्फेक्शन, ज्याला कोरोनाव्हायरस असे म्हटले जाते. आजूबाजूच्या देशातील सीफूड मार्केटपासून सुरू झालेला नि:संसर्गजन्य संसर्ग, डझनहून अधिक लोकांवर परिणाम झाला तसेच, छातीच्या संसर्गाच्या अज्ञात कारणामुळे नऊ जणांवर परिणाम झाला आहे; आणि ही संख्या झपाट्याने वाढत गेली आणि डोळे मिटायच्या आत दोनशे जणांना संक्रमन झाले, त्यातील काही गंभीर अवस्थेत आहेत तर, काहींना आपला प्राण गमवावा लागला आहे.
 
कोरोनाव्हायरस सार्स'मध्ये(SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सीफूडपासून हा वायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. तरीही आतापर्यंत यावर, कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत.

संसर्गजन्य रोगांच्या पहिल्या तत्त्वांमध्ये, सर्वात वाईट बग्स मानवी संपर्काचे चक्र तोडून किंवा निर्जंतुकीच्या स्थितीत संपर्क राखून असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला एखाद्या संसर्गाची सुरूवात झाली आहे, तर तुम्ही डॉक्टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन भेट देणे गरजेचे आहे. निदान होईपर्यंत किंवा लक्षणांचे निराकरण होईपर्यंत स्वत: ला इतरांपासून दूर ठेवा. प्रभावित क्षेत्रांचा प्रवास करणे किंवा त्या भागातील लोकांशी संपर्क साधणे केवळ सरकारी सल्लामसलत किंवा  तपासल्यानंतरच करावे.
 
ही एक विकसित होणारी घटना आहे: आम्ही या विषयी काही ऐकले जास्त न्हवते, तसेच कोरोनाव्हायरस बद्दल पुरेशी माहिती ही नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परदेशी नागरिकांच्या भारतात येण्यावर काही निर्बंध