Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करोना व्हायरसचा परिणाम शेअर बाजारावर, सेन्सेक्समध्ये १३०० अंकांची घसरण

webdunia
शुक्रवार, 6 मार्च 2020 (16:10 IST)
करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम आता शेअर बाजारावर झाल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी शेअर बाजार उघडताच मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे १३०० अंकांची घसरण झाली असून निफ्टीमध्ये देखील ३५० पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे. गुरुवारी सेन्सेक्स सुमारे ४७८ अंकांनी चढला आणि दिवस अखेरेस ६१.१३ अंकांवर म्हणजे ०.१६ टक्क्यांनी वाढून ३८,४७९.६१ अंकांवर बंद झाला. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स १३०० अंकांनी घसरून ३७,१८० अंकांवर उघडला. तर गुरुवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ०.१५ टक्कांनी वाढून १८ अंकांसह ११, २६९ अंकांवर बंद झाला होता. निफ्टी ३८५ अंकांच्या घसरला असून १०,८८१ अंकांनी उघडला आहे.
 
गुरुवारी सेन्सेक्स कंपन्यांध्ये कोटक बँक, एचसीएस टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस, भारतीय एअरटेल, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स आणि एसबीआय यांच्या शेअर्सना फायदा झाला होता. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांच्या गुरुवारी तोटा झाला. आता येस बँकेवरील निर्बंधांमुळे शेअरमध्ये २५ टक्के तर एसबीआयच्या शेअरमध्ये सात टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्याच्या अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या योजना