Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Corona ला झुंज देऊन लढाई जिंकली, दिल्लीच्या पहिल्या रुग्णाची कहाणी

webdunia
  • facebook
  • twitter
  • whatsapp
share
सोमवार, 16 मार्च 2020 (16:46 IST)
नवी दिल्ली- Covid-19 म्हणजे कोरोना व्हायरस (Corona Virus) मुळे पूर्ण जगात भीती निर्मित झाली आहे. जगातील जगातील दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश भारत देखील याहून अस्पृश्य नाही. परंतू, सर्वात विशेष बाब म्हणजे कोरोनाला लढा देता येऊ शकते. याला घाबरण्याची गरज नाही. वेळेवर सतर्क राहून याहून बचाव करता येऊ शकतो आणि  कोरोना संक्रमित झाल्यावर देखील घाबरण्याची बाब नाही.
 
कोरोनाच्या भीती असताना दिल्लीहून आलेल्या एक सुखद बातमीनुसार कोरोना संक्रमित रोहित दत्ता यांनी या व्हायरसला झुंज देत जंग जिंकली आहे. सोबतच त्यांनी देशातील नागरिकांना संदेश दिला की यावर मात करता येऊ शकते.
 
नवभारत टाइम्सच्या या सकारात्मक स्टोरीचे काही अंश आम्ही आभार सह जनहितार्थ प्रकाशित करत आहोत कारण लोकांना या भीतीपासून लढण्यात मदत मिळू शकेल.
 
या प्रकारे केले कोरोनाला पराभूत 
खरं तर, ही कहाणी कोरोना संक्रमित झालेल्या दिल्लीच्या 45 वर्षीय रोहित दत्ता यांची आहे. मयूर विहार फेज-2 येथील रहिवासी दत्ता सफदरजंग हॉस्पिटलहून स्वस्थ होऊन घरी परतले आहे. त्यांनी म्हटले की हे माझ्यासाठी नवीन जीवनात पाऊल टाकल्यासारखा अनुभव आहे. मी आता पूर्णपणे स्वस्थ आहे आणि लोकांना यापासून घाबरण्याची गरज नाही. होय, त्यांना सतर्क राहण्याची गरज नक्कीच आहे. त्यांनी म्हटले की आपण आरोग्या आणि सफाईचं विशेष लक्ष ठेवलं पाहिजे.
 
रोहित यांनी सांगितले की आइसोलेशन वॉर्ड कोणत्याही प्रायव्हेट वॉर्डच्या व्हीआयपी खोलीपेक्षा अधिक चांगलं होतं. त्यांना काहीही वेगळे जाणवलं नाही. या दरम्यान त्यांनी घरच्या लोकांशी संपर्क केला, चित्रपट बघितले, पुस्तकं वाचल्या. सोशल मीडियावर देखील त्यांची नजर होती.
webdunia
...जेव्हा आरोग्य मंत्र्यांचा फोन आला
त्यांनी म्हटले की होळीच्या दिवशी त्यांना एकटेपणा जाणवत होता. त्याच दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा व्हिडिओ कॉल आला. त्यांनी केवळ आरोग्याबद्दलच विचारपूस केली नाही तर हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे त्यांची काळजी घेतली जात आहे हे देखील विचारले. त्यांनी मला याला समोरा जाण्याचं धैर्य आणि बळ दिलं.
 
रोहित यांनी सांगितले की एक वेळ अशी देखील होती जेव्हा पूर्ण देशाची नजर माझ्यावर होती. मी परत घरी येईन अथवा नाही यावर सर्वांच लक्ष लागलेलं होतं. परंतू मला काही होणार नाही असा डॉक्टरांना पूर्ण विश्वास होता. या दरम्यान, 9 आणि 11 मार्च रोजी त्यांचे सँपल पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि जेव्हा दोन्ही रिर्पोट नेगेटिव्ह आल्या तेव्हा 14 मार्च रोजी मला सुट्टी देण्यात आली.
 
रोहित यांचा लोकांना सल्ला
दत्ता यांच्या प्रकारे ते आता व्हायरसहून पूर्णपणे मुक्त झाले आहेत परंतू डॉक्टरांनी त्यांना अजून 14 दिवस घरात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की मी लोकांना सांगू इच्छित आहोत की घाबरू नका आणि घरात दडपून बसू नका. बाहेर निघा, परंतू सोबतच पूर्ण सावध राहा आणि जराही कोरोनाचे लक्षण दिसत असल्यास लगेच हॉस्पिटलमधून जाऊन तपासणी करवा. त्यांनी म्हटले की हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि मी याचं जिवंत उदाहरण आहे.
 
घाबरू नका सतर्क राहा 
रोहित यांनी सांगितले की दिवसातून दोन-तीनदा डॉक्टर त्यांना तपासत होते. त्यांचे कपडे बदलत जात होते. वॉर्ड स्वच्छ ठेवण्यात येत होतं. आणि सर्वात विशेष बाब म्हणजे त्याचा उपचार पूर्णपणे नि:शुल्क करण्यात आला.
 
रोहित यांनी म्हटले की लोकांमध्ये सर्वात अधिक भीती आणि भ्रम 'आइसोलेशन' शब्दामुळे आहे. लोकांना वाटतंय की माहीत नाही कोणत्या अंधारकोठडी टाकून उपचार केला जात असेल, परंतू असे काही नाही. त्यांनी म्हटले की मला अधिक औषधं देखील खावे लागत नव्हते.
 
टेक्सटाईलच्या व्यवसाय करणार्‍या रोहित दत्ता यांनी सांगितले की ते आपल्या पत्नीच्या भावासोबत लेदर फेअरमध्ये सामील होण्यासाठी इटली गेले होते. तेथून परत आल्यावर त्यांना हलका ताप आला, पण औषध घेतल्यानंतर तो बरा झाला. नंतर 28 फेब्रुवारी रोजी पुन्हा त्रास होऊ लागला. या दरम्यान कोरोनाच्या बातम्या मीडियात येऊ लागल्या होत्या. मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि तपासणी केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. ... आणखी तेथे उपचार घेतल्यावर आता मी पूर्णपणे स्वस्थ होऊन घरी परतलो. 

Share this Story:
  • facebook
  • twitter
  • whatsapp

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

webdunia
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद, चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द