Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Corona virus : दिल्लीत आढळला पहिला रुग्ण

Corona virus : दिल्लीत आढळला पहिला रुग्ण
, सोमवार, 2 मार्च 2020 (16:28 IST)
दिल्ली आणि तेलंगण या ठिकाणी कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. चीनमधून जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा दिल्लीत आढळलेला हा पहिलाच रुग्ण आहे. यापूर्वी केरळमध्ये कोरोना व्हायरसचे तीन रुग्ण आढळले होते. आता दिल्ली आणि तेलंगण या ठिकाणीही कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 
 
चीनमधील वुहानमधून कोरोना व्हायरसची लागण सुरु झाली. भारतात केरळनंतर तीन रुग्ण आढळले होते. या तिघांवरही उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता आणखी दोन रुग्ण एक दिल्लीत तर एक तेलंगण येथील आढळले आहेत. दिल्लीत कोरोनाची लागण झालेला रुग्ण नुकताच इटलीहून परतल्याचं समजतं आहे. तेलंगण आढळलेला रुग्ण दुबईतून परतला आहे. 
 
चीनमध्ये आत्तापर्यंत 2800 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आत्तापर्यंत 29 जणांचा तर इराणमध्ये 54 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत या व्हायरसमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vodafone-ideaचा बंपर ऑफर, आता वापरकर्त्यांना दररोज 3 जीबी डेटा मिळेल