नैतिक जबाबदारी स्वीकारून शाहा यांनी राजीनामा द्यावा : सुळे

शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (16:09 IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना राजधानी दिल्लीत हिंसाचार उसळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. दिल्लीत घडलेला हिंसाचार हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी जळगावच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. 
 
दंगलीच्या काळात गृहमंत्रालय नेमकं काय करत होते? याची चौकशी पंतप्रधान कार्यालयातून झालीच पाहिजे. परंतु त्या आधी ‘इंटेलिजन्स फेल्युअर’ची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. अमित शाहांच्या जागी मी असते तर निश्चितच आत्मचिंतन केले असते, असेही त्या म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ