जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबत धक्कादायक रिर्पोट जाहीर केली आहे. WHO ने आपल्या रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरस (COVID-19) ला स्वाइन फ्लू पेक्षा 10 पण अधिक प्राणघातक असल्याचे जाहीर केले आहे. स्वाइन फ्लू अर्थात H1N1 2009 मध्ये जागतिक साथीच्या आजाराचं कारण होतं.
जिनिव्हामध्ये डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस एडनोम घेब्येयियस यांनी डिजिटल प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये म्हटले की 'आम्हाला माहित आहे की COVID-19 वेगाने पसरते. त्यांनी हे देखील म्हटले की कोरोना 2009 फ्लू च्या साथीच्या आजारापेक्षा 10 पट जास्त धोकादायक आहे.