Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना संसर्ग: व्यक्ती किंवा समुहावर होणारी जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक

coronavirus-use-sanitation-dome-or-tunnel-prevent-corona-infection-likely-dengerous
सॅनिटेशन डोम अथवा टनेलचा वापर न करण्याच्या सूचना

कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो म्हणून  फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये, अशी सूचना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.

त्यानुसार आज सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत असून त्याद्वारे व्यक्ती किंवा समुहावर वापर केला जात आहे. यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना आटील यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Coronavirus : राज्यात काल ५५२ नवीन रुग्णांचे निदान; आरोग्यमंत्र्यांची माहिती




Hanuman Chalisa In Marathi
Hanuman Chalisa In Marathi