करोनामुळे पसरलेल्या या संकटाच्या काळात दिलासादायक बातमी म्हणजे गोवा राज्य करोनामुक्त झाले आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयीची माहिती दिली.
दरम्यान उपचार सुरू असलेल्या शेवटच्या रुग्णांची टेस्टही निगेटिव्ह आली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी अथक परिश्रम करणाऱ्या डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
देशातील २३ राज्यांमधील ४५ जिल्ह्य़ांमध्ये गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. अशा जिल्ह्य़ांचा बिगर हॉटस्पॉट श्रेणीत (नारंगी श्रेणी) समावेश केला जातो. पुढील १४ दिवसांमध्येही नवा रुग्ण न आढळल्यास हे जिल्हे करोनामुक्त मानले जातात.