कोरोना व्हायरचा फैलाव संपूर्ण जगात दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा सर्व परिस्थितीत भारताचे मात्र विशेष कौतुक संपूर्ण जगातून होत आहे. भारताचं कौतुक करणाऱ्या राष्ट्रांमध्ये स्वित्झर्लंड देखील पुढे आला आहे.
स्वित्झर्लंडने अनोख्या पद्धतीत भारताचे कौतुक केलं आहे. शुक्रवारी भारताच्या सन्मानार्थ लेसर लाईटच्या मदतीने मॅटरहॉर्न पर्वताला तिरंग्याच्या रंगात रंगवण्यात आहे. मॅटरहॉन डोंगर स्वित्झर्लंडमध्ये स्विस आलप्स याठिकाणी आहे. स्वित्झर्लंडमधील भारतीय दूतावासाने ट्विटरवर हे अनोखं चित्र शेअर केले आहे.
कोरोना वादळ अद्यापही शमलेलं नाही. भारतात देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा सर्व परिस्थितीत भारत अन्य देशांची देखील मदत करतत आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकढचं नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही पोस्ट रिट्विट करत स्वित्झर्लंडचे आभार मानले आहे. 'संपूर्ण जग Covid-19वर मात करण्यासाठी एकजूटीनं काम करत आहे. या महामारीवर निश्चित रूपात माणूसकीचा विजय होईल असं देखील पंतप्रधान म्हणाले.