Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

15 ऑगस्टपर्यंत येणार COVID-19ची लस

15 ऑगस्टपर्यंत येणार COVID-19ची लस
, शुक्रवार, 3 जुलै 2020 (09:42 IST)
भारतात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असताना एका दिलासादायक बातमी आहे. ICMR कडून 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाचं वॅक्सीन येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. 
 
देशात आणखी एका वॅक्सीनला ह्युमन ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली आहे. देशात 5 दिवसांच्या आत क्लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाचे दररोज 20 हजाराच्या आसपास रुग्ण वाढत असल्यानं ही बातमी निश्चितच दिलासा देणारी आहे. 
 
ह्युमन ट्रायलनंतर 15 ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR कडून ही लस भारतात लाँच केली जाऊ शकते. COVAXIN असं या लसीचं नाव असू शकेल असं सांगण्यात येत आहे. 
 
दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे वॅक्सीन कसं काम करणार हे 7 जुलैला पहिल्या ह्युमन ट्रायलनंतर कळू शकेल. आतापर्यंत कोरोनावर 125 हून अधिक वॅक्सीनवर काम सुरू आहे. मात्र त्यापैकी भारतात ह्युमन ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे. 7 जुलैला पहिल्यांदा ह्युमन ट्रायल करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चला, नवीन स्मार्ट टीव्ही घेऊया, वनप्लसकडून तीन टीव्ही लाँच