Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गेल्या २४ तासात गुजरात आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्ण

गेल्या २४ तासात गुजरात आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्ण
, गुरूवार, 2 जुलै 2020 (16:09 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या २४ तासात गुजरात आणि कर्नाटकात झालेला पाहायला मिळत आहे. या दोन राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४  तासांत गुजरातमध्ये कोरोनाव्हायरस संसर्गाचे सर्वाधिक६७५ रुग्ण आढळले आहेत. आता राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ३३,३१८ वर गेली आहे. याबाबत आरोग्य विभागाने स्पष्ट केले, कोविड-१९ मुळे बुधवारी २१ लोकांचा मृत्यू झाला असून राज्यात मृतांची संख्या १८६९ झाली आहे. या व्यतिरिक्त रुग्णालयातून ३६८ रुग्ण बरे झाले असून ठणठणीत झालेल्या रुग्णांची संख्या २४,०३८ झाली आहे.
 
बुधवारी अहमदाबादमध्ये संसर्गाची २५१ प्रकरणे पुढे आल्याचे आरोग्य विभागाने निवेदन जारी करताना सांगितले. तर सुरत येथे २०१ रुग्णांची नोंद झाली आहे.  सुरतमध्ये पहिल्यांदाच २०० पेक्षा जास्त कोरोना प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अहमदाबादमध्येच कोरोना विषाणू रुग्णांची एकूण संख्या २११२८ तर सुरतमध्ये ५०३० इतकी झाली आहे.
 
अहमदाबादमध्ये बुधवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने माहिती देताना म्हटले आहे. त्यानंतर एकूण मृतांची संख्या १४४९ वर गेली आहे. तर सुरतमधील कोविड -१९मधील आणखी पाच जणांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या १६३वर पोहोचली. राजकोट, भरुच, अरावली, बनासकांठा, खेडा, अमरेली, दाहोद आणि देवभूमी द्वारका जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
 
कोरोना विषाणूची लागण झालेल्या इतर जिल्ह्यांमध्ये बुधवारी नवसारी (२४), जामनगर (१८), भरूच (१५), राजकोट (१५), वलसाड (१५), बनासकांठा (१२), सुरेंद्रनगर (१२) आणि मेहसाणा (१०) यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यात सध्या कोरोनाचे ७४११ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. यापैकी ६३ रुग्ण व्हेंटिलेटरवर कोरोनाविरूद्ध युद्ध लढा देत आहेत. 
 
गेल्या २४ तासांत कर्नाटकात १२७२ नवीन रुग्ण नोंदले गेले, जे एका दिवसात सर्वाधिक नोंद झाले आहे. कोरोना विषाणू संक्रमणामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्गाच्या नवीन घटनांसह राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या १६,५१४ पर्यंत पोहोचली आणि संसर्गामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या २५३ वर पोचली. बुधवारी नोंदविण्यात आलेल्या१२७२ नवीन प्रकरणांपैकी ७३५ प्रकरणे एकट्या बंगळुरु शहरातील आहेत. राज्यात कोविड -१९ च्या एकूण १६,५१४ घटनांची नोंद झाली असून त्यामध्ये २५३ जणांच्या मृत्यूंचा समावेश आहे, तर ,,८०६३ लोक बरे झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आणखी एका व्हारसमुळे हरभजन चीनवर संतापला