Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आणखी एका व्हारसमुळे हरभजन चीनवर संतापला

आणखी एका व्हारसमुळे हरभजन चीनवर संतापला
नवी दिल्ली , गुरूवार, 2 जुलै 2020 (15:40 IST)
सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये आणखी एक नवा स्वॉईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर काही सेलिब्रिटींनी चीनवर तोंडसुख घेतले आहे. भारताचा फिकरीपटू हरभजन सिंग याने टि्वटरद्वारे चीनवर राग व्यक्त केला. 
 
हरभजन सिंगने टि्वट केले की, संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने ग्रासले आहे आणि चीनने मात्र सार्‍यांसाठी आणखी एक व्हायरस तयार करून ठेवला आहे. यासोबतच त्याने राग व्यक्त करणारे इमोजीदेखील शेअर केले आहेत. 
 
दरम्यानल, नवा स्वॉइन फ्लू इतका शक्तिशाली आहे की तो माणसाला आजारी पाडू शकतो. जर कोरोना साथीच्या वेळी नव्या स्वॉइन फ्लूचा संसर्ग पसरला तर तो गंभीर रुप धारण करेल, असे चीनमधील अनेक विद्यापीठाने आणि चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आले आहे. नव्या स्वॉईन फ्लूला जी 4 असे नाव देण्यात आले आहे. याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी 2011 ते 2018 या कालावधीत संशोधन केले. तसेच यादरम्यान 10 राज्यांमधील 30 हजार डुकरांच्या  नाकातून नमूने घेतले.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिमला करार: बेनझीर भुट्टोंना पाकिजा सिनेमा का पाहावा लागला?