Dharma Sangrah

देवेंद्र फडणवीस झाले कोरोनामुक्त

Devendra Fadnavis
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ते जसं आधी म्हणाले होते त्याप्रमाणे सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले होते.  सेंट जॉर्ज रुग्णालयाचे सुप्रीटेंडंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचे १० दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. 
 
देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर होम क्वारंटाइन असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्याने त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती. देवेंद्र फडवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही ९३ पर्यंत खाली आली होती. त्यामुळे मागील आठवड्यात त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९७ पर्यंत वाढली. गेल्या रविवारी आणि सोमवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचे डोसही देण्यात आले होते असंही डॉ. खोब्रागडे यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्यावेळी भाजपला 'आणीबाणी' आठवली नाही, रोहित पवार यांचा टोला