Publish Date: Thu, 02 Jul 2020 (16:16 IST)
Updated Date: Thu, 02 Jul 2020 (16:22 IST)
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना तपासणीसाठी मेडिकल स्लिपची सक्ती त्वरित रद्द करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. अनावश्यक डॉक्टरांच्या परवानगीमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये अधिक दबाव आहे, असे राज्यांना सांगण्यात आले आहे. या नियमामुळे सामान्य लोकांना कोरोना चाचणी घेण्यास बराच विलंब होत आहे.
आयसीएमआरने पुढे लिहिले आहे की, राज्यातील सर्व चाचणी प्रयोगशाळांना (टेस्ट लॅब्स) कोणत्याही वैद्यकीय स्लिपशिवाय चाचणी घेण्यास परवानगी देण्यात यावी. त्याचबरोबर केवळ सरकारी डॉक्टरांकडूनच तपासणी स्लिप घेण्याची गरज नाही. सर्व खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनाही तपासणीस परवानगी देण्याचा अधिकार मिळायला हवा.