Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्य सेविका आणि डायल 108 नंबर ऍम्ब्युलन्स चालकांना सुद्धा 50 लाखांच्या विम्याचे संरक्षण द्यावे

आरोग्य सेविका आणि डायल 108 नंबर ऍम्ब्युलन्स चालकांना सुद्धा 50 लाखांच्या विम्याचे संरक्षण द्यावे
, शनिवार, 16 मे 2020 (09:29 IST)
कंत्राटी सफाई कामगार; डायल नंबर  108 ऍम्ब्युलन्स चालक तसेच आरोग्य सेविका यांना महापालिकेने त्यांच्या स्वसंरक्षणाचे किट; हॅन्ड ग्लोज; मास्क; सॅनिटायझर द्यावेत. कंत्राटी सफाई कामगार आणि ऍम्ब्युलन्स चालक यांना दोन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. कंत्राटी सफाई कामगार; आरोग्य सेविका आणि डायल 108 नंबर ऍम्ब्युलन्स चालकांना सुद्धा 50 लाखांच्या विम्याचे संरक्षण द्यावे. या मागण्यांकडे राज्य सारकर ने लक्ष द्यावे. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
 
रस्त्याने उन्हातान्हात पायी चालत गावी जाणाऱ्या मजुरांना आडवून त्यांना जवळच्या रेल्वे स्थानकावरून रेल्वे ने त्यांच्या गावी सोडावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी राज्य सरकारला केली आहे. 
 
देशात जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा  रेड झोन मध्ये लॉकडाऊन वाढवावा. 17 मे पर्यंत तिसरा लॉक डाऊनचा कालावधी संपणार असून 18 मे ते 31 मे पर्यंत 4 था लॉक डाऊन देशात लागू करावा त्यात रेड झोन मध्ये लॉक डाऊन जाहीर करावा अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न