Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाचे १५७६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २९ हजार १०० रुग्ण

कोरोनाचे १५७६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २९ हजार १०० रुग्ण
, शनिवार, 16 मे 2020 (09:22 IST)
६५६४ रुग्ण बरे होऊन घरी -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. १५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. 
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या १०६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ३४,पुण्यात ६,अकोला शहरात २, कल्याण डोंबिवलीमध्ये२, धुळयात २,पनवेलमध्ये १,जळगाव १ तर औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २२ रुग्ण आहेत तर २३  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये (६५टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वानखेडे मैदान क्वारंटाइन सुविधेसाठी द्या